26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयदेशात १३,०५८ नवी रुग्णसंख्या

देशात १३,०५८ नवी रुग्णसंख्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासांत केवळ १३ हजार ५८ नवे रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केल्या २३१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तसेच १९ हजार ४७० रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली असून १६४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ४० लाख ९४ हजार ३७३ झाली असून आतापर्यंत ३ कोटी ३४ लाख ५८ हजार ८०१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत ४ लाख ५२ हजार ४५४ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

देशात सध्या १ लाख ८३ हजार ११८ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. ही संख्या गेल्या २२७ दिवसांतील सर्वात कमी आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.१४ टक्के आहे. तर, विकली पॉझिटिव्हिटी रेट १.३६ टक्क्यांवर असून, हा दर गेल्या ११६ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटिव्हिटी रेट १.११ टक्क्यांवर आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या