27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयगुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी पाण्यात

गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी पाण्यात

एकमत ऑनलाईन

शेअर बाजारातील घसरण, ब्लॅक मंडेचा फटका, ४ दिवसांत मोठे नुकसान

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला असून सेन्सेक्समध्ये ९५३ अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात घसरण झाली असून त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. गेल्या ४ दिवसात गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत, तर गेल्या ९ दिवसांचा विचार करता गुंतवणूकदारांचे १८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील एकूण भांडवलामध्ये मोठी घट झाली आहे.

शेअर बाजारात सातत्याने असलेल्या विक्रीच्या दबावामुळे गेल्या ९ दिवसांत मुंबई शेअर बाजारातील संपत्तीत १८ लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील एकूण भांडवल २८६.७१ लाख कोटी रुपयांवरून २६९ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. यापैकी गेल्या ४ दिवसांमध्ये बहुतांश संपत्ती घट झाली आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये १४ लाख कोटी रुपयांची संपत्ती कमी झालेली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना हा फार मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांत शेअर बाजारात घसरणच पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेच्या फेडने त्याच्या व्याजदरात ७५ अंकांची वाढ केल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पडला आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी फेडने भविष्यात व्याजदात आणखी वाढ करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंग्लंडनेही त्याच्या व्याजदरात वाढ केले. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या ३० तारखेला आपले निवेदन जारी करणार आहे.

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ९५३ अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३११ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये १.६४ टक्क्यांची घसरण होऊन तो ५७,१४५ अंकांवर पोहोचला, तर निफ्टीमध्ये १.७९ टक्क्यांची घसरण होऊन तो १७,०१६ अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही ९३० अंकांची घसरण होऊन तो ३८,६१६ अंकावर पोहोचला.

परकीय गुंतवणूकदारांचा
विक्रीचा सपाटा सुरू
फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असून एका आठवड्यात त्यांनी ४,३६२ कोटी रुपयांचे शेअर्स विक्री केले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. आठवड्यातील पहिल्याच दिवशी आज शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली.

रुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत रुपयाची निचांकी घसरण झाली आहे. आज रुपयाच्या किमतीत ६३ पैशांची घसरण झाली. त्यामुळे आज रुपयाची किंमत ही ८१.६२ इतकी झाली आहे. मागच्या काही दिवसांत रुपयाच्या घसरणीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे आयात करण्यात येणा-या वस्तूंसाठी आता ज्यादा किंमत मोजावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या