28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअ‍ॅपल कंपनीला १४० कोटींचा गंडा

अ‍ॅपल कंपनीला १४० कोटींचा गंडा

एकमत ऑनलाईन

भारतीय कर्मचा-याने केली फसवणूक
नवी दिल्ली : अ‍ॅपल कंपनीला एका माजी कर्मचा-याने २० मिलियन डॉलरला (१४० कोटी) चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. अ‍ॅपल कंपनीला कोट्यवधींचा गंडा घातल्या प्रकरणी भारतीय वंशाच्या धीरेंद्र प्रसाद याला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी धीरेंद्र याला २० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. धीरेंद्र याने अ‍ॅपल कंपनीसोबत जवळपास १० वर्षे काम केले आहे. धीरेंद्र याने २०१८ पर्यंत कंपनीला १४० कोटींचा चुना लावल्याचा आरोप केला आहे.

भारतीय वंशाचे धीरेंद्र प्रसाद १० वर्षांपासून अ‍ॅपल कंपनीत ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. धीरेंद्रने आपला गुन्हा कबूल केला असून २० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. धीरेंद्र याने कॅलिफोर्निया येथील अ‍ॅपल कंपनीला १४० कोटी रुपयांचा चूना लावला आहे. या प्रकरणी धीरेंद्रला २० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे वेगवेगळ््या आयडियाचा वापर करत कंपनीला चुना लावल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचार करणे, चलन वाढवणे, अ‍ॅपलला कधीही न मिळालेल्या सर्व्हिससाठी पैसे घेणे यासारखी अनेक कामे करत धीरेंद्रने पैसे जमा केले होते.

धीरेंद्र प्रसाद यांचा निर्णय कोर्टाने मार्चपर्यंत राखून ठेवला आहे. मार्चमध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे स्थानिक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. धीरेंद्र याला मेल फसवणूक आणि वायर फसवणूक करण्याच्या कटामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकन सरकारने धीरेंद्र प्रसाद याची पाच मिलियन डॉलरपेक्षा अधिक संपती जप्त केली आहे.

५२ वर्षीय धीरेंद्र यांनी
दिली गुन्ह्याची कबुली
एका लिखित याचिकेत ५२ वर्षीय प्रसादने गुन्ह्याची कबूली दिली. त्याने २००८ ते २०१८ या कालावधीत अ‍ॅपल कंपनीसोबत ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम केले आहे. २०११ पासून धीरेंद्रने कंपनीत घोटाळा करायला सुरुवात केली होती. यातून अ‍ॅपल कंपनीची १७ मिलियन डॉलर म्हणजेच १४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या