19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयत्या ९ पत्रकारांवर १५ दिवसांची प्रवासबंदी

त्या ९ पत्रकारांवर १५ दिवसांची प्रवासबंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातली विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्सने नऊ पत्रकारांवर प्रवास बंदी घातली आहे. कंगना रानावत उपस्थित असलेल्या विमानात घुसून या पत्रकारांनी गोंधळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या पत्रकारांना इंडिगोने १५ दिवसांसाठी प्रवासबंदी केली आहे.

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) इंडिगोला ९ सप्टेंबरच्या घटनेसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. डीजीसीएचे म्हणणे होते की, चंदीगड-मुंबईच्या फ्लाईटमध्ये गोंधळ घालणा-या लोकांविरोधात योग्य कारवाई करण्यात यावी. कंगना या विमानात पहिल्या रांगेत बसली होती. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर उतरले टीव्ही रिपोर्टर्स आणि छायाचित्रकारांनी तिचे फोटो घेण्यासाठी थेट विमानात घुसले होते.

डीजीसीएने प्रसिद्ध केल्या नव्या गाईडलाइन्स
या घटनेनंतर डीजीसीएने नियमांमध्ये थोडा बदल केला. त्यामुळे आता विमानात विनापरवानगी कोणीही फोटो काढू शकणार नाही. विमानाचं उड्डाण, लँंिडग आणि सुरक्षित ठिकाणी उभं राहिल्यानंतर फोटो काढण्याची परवानगी नाही. तसेच विमान प्रवासादरम्यान रेकॉर्डिंगचं कोणतंही उपकरण वापरण्यास परवानगी असणार नाही.

आरएसएस च्या मर्जीनेच चीनने जमीन बळकावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या