24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसोमालियात दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

सोमालियात दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मोगादिशू : सोमालियामध्ये मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच, हॉटेलमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. तब्बल १४ तासांनंतर ऑपरेशन संपले आहे.

सोमालियात मुंबई झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मोगादिशूमधील आहे. जिथे बंदुकधारींनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायद्याशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दहशतवादी हल्ल्यात १५ ठार
हयात हॉटेलवर अल-शबाबच्या हल्ल्यातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आलेली नाही. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. तब्बल १४ तास सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना लढा दिला. अखेर १४ तासांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कायद्याशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या