26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयलोन अ‍ॅपच्या माध्यमातून १५० कोटी उकळले

लोन अ‍ॅपच्या माध्यमातून १५० कोटी उकळले

एकमत ऑनलाईन

चिनी महिलेसह दोघांना अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली : लोन ऍपच्या माध्यमातून १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका चिनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. तसेच या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

आयएफएसओचे डीसीपी प्रशांत गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना एनसीआरपी पोर्टलवर अनेक तक्रारी येत होत्या की, लोन ऍपपद्वारे कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांकडून खंडणी उकळली जात होती. जर पैसे दिले गेले नाहीत, तर आरोपी पीडितांचे फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळत होते. आयएफएसओने याची दखल घेत एनसीआरपीमधील तक्रारींचा तपास करण्यास सुरुवात केली होती.

तपासाबाबत माहिती देताना गौतम यांनी सांगितले की, १०० हून अधिक ऍप्सचा कर्ज आणि खंडणीच्या रॅकेटमध्ये समावेश आहे. सर्व ऍप्स वापरकर्त्याच्या वैयक्तिक डेटाचे अनधिकृतपणे एक्सेस मिळवत होते. यामध्ये युजर कॉन्टॅक्ट लिस्ट, चॅट, मेसेजेस आणि पिक्चर्स असा पर्सनल डेटा मिळवून तो डेटा भारतात आणि परदेशातील सर्व्हरवर अपलोड करत होते. ५ ते १० हजार रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जांची नितांत गरज असलेल्या लाखो सामान्य नागरिकांना कर्ज देऊन अधिकचे पैसे भरण्यास भाग पाडले जात होते. यामुळे देशात अनेक नागरिकांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या