Saturday, September 23, 2023

देशात तीन दिवसांत १५ हजार नवे रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत ४ हजार ९७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १३९ झाली आहे. त्यापैकी ३ हजार १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ हजार १७४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट ३८़७३ टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ५८ हजार ८०२ आहेत.

Read More  कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी-देवेंद्र फडणवीस

देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ३५ हजार ५८ झाला आहे. त्यातील ८ हजार ४३७ बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट २४़०६ टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत १ हजार २४९ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या
* केरळमध्ये ६३० रुग्ण, त्यातील ४९७ बरे झाले, ४ मृत. रिकव्हरी रेट ७८़८८ टक्के, गेल्या आठ दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांवरुन ७८ टक्क्यांवर आला आहे.
* तामिळनाडू ११, ७६० रुग्ण, त्यापैकी ४ हजार ४०६ बरे झाले, मृतांचा आकडा ८१, रिकव्हरी रेट ३७़४६ टक्के
* गुजरात ११ हजार ७४५ रुग्ण, त्यामधील ४ हजार ८०४ बरे झाले, मृतांचा आकडा ६९४, रिकव्हरी रेट ४०.९० टक्के
* दिल्ली १० हजार ५४ रुग्ण, पैकी ४ हजार ४८५ बरे झाले, मृतांचा आकडा १६८, रिकव्हरी रेट ४४़६० टक्के
* राजस्थान ५ हजार ५०७ रुग्ण, त्यातील ३ हजार २१८ बरे झाले, मृतांचा आकडा १३८, रिकव्हरी रेट ५८़४३ टक्के
* मध्यप्रदेश ५ हजार २३६ रुग्ण, त्यामधील २ हजार ४३५ बरे झाले, मृतांचा आकडा २५२, रिकव्हरी रेट ४६़५० टक्के
* पश्चिम बंगाल २ हजार ८२५ रुग्ण, त्यापैकी १ हजार ६ बरे झाले, मृतांचा आकडा २४४, रिकव्हरी रेट ३५़६१ टक्के

एकाच दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. एका रुग्णापासून १० हजार रुग्ण संख्या होण्यासाठी सुमारे अडीच महिन्याचा कालावधी लागला होता. भारतात १३ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या पार गेला होता. पण मे महिन्यातील १६ आणि १७ तारखेला म्हणजे दोन दिवसातच कोरोनाचे १० हजारांपेक्षा रुग्ण समोर आले आहेत. १७ मे रोजी २४ तासात ५हजार २०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर १६ मे रोजी ४ हजार ८०० पेक्षा जास्त रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात भारत अकराव्या स्थानी आहे. तर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आहेत.

कोणत्या देशात किती कोरोनाचे रुग्ण

  • अमेरिका – १५ लाख ८ हजार ५९८
  • रशिया – २ लाख ९० हजार ६७८
  • ब्राझिल – २ लाख ५५ हजार ३६८
  • युनायटेड किंगडम – २ लाख ४७ हजार ७०९
  • स्पेन – २ लाख ३१ हजार ६०६
  • इटली – २ लाख २५ हजार ८८६
  • फ्रान्स – १ लाख ८० हजार ५१
  • जर्मनी – १ लाख ७६ हजार ५५१
  • तुर्की – १ लाख ५० हजार ५९३
  • इराण – १ लाख २२ हजार ४९२
  • भारत – १ लाख १ हजार १३९

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या