28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयराणी एलिझाबेथ यांच्या अंतिम दर्शनासाठी १६ किमीची रांग

राणी एलिझाबेथ यांच्या अंतिम दर्शनासाठी १६ किमीची रांग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हजारो लोकांनी गुरुवारी दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. ब्रिटनची राजधानी लंडन येथील संसदेच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांची शवपेटी स्कॉटलंडहून रस्ते आणि हवाई मार्गाने बकिंगहॅम पॅलेसमध्ये आणण्यात आली आहे.

महाराजा चार्ल्स तिसरे, त्यांचे पुत्र प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी हे देखील बुधवारच्या अधिकृत मिरवणुकीत उपस्थितांसह चालत होते. राणीची इतर मुले- राजकुमारी ऍनी, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड – देखील अधिकृत मिरवणुकीत सामील झाले होते. शवपेटी घोडागाडीत ठेवण्यात आली होती. यावेळी हजारो लोक शोक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उभे होते. ४० मिनिटांच्या प्रवासात शांतता राहावी यासाठी हीथ्रो विमानतळवरील विमानाच्या उड्डाणांचे वेळापत्रक बदलले होते. यावेळी हायड पार्क आणि बिग बेन येथे बंदुकीची सलामी देण्यात आली.

कॅफिनवर शाही ध्वज गुंडाळलेला आहे, ज्यावर मुकुट ठेवला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता अंतिम विधी सोहळ्याला सुरुवात झाली. महाराणीच्या अंतिम दर्शनासाठी चार किलोमीटरहून अधिक लांब रांग लागली आहे. सोमवारी सकाळी ६:३० वाजेपर्यंत लोक राणीचे अंतिम दर्शन घेऊ शकतील, त्यानंतर सकाळी ११ वाजता वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे संपूर्ण सरकारी सन्मानाने त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या