22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्र१६ बंडखोरांचं निलंबन होणार? सिल्व्हर ओकवर बैठक पार पडली

१६ बंडखोरांचं निलंबन होणार? सिल्व्हर ओकवर बैठक पार पडली

एकमत ऑनलाईन

मुंबई – सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण पाहता अनेक घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार का असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर महाकिास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून बैठाकांचे सत्र सुरु आहे. या बैठकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती मिळत आहे. १६ बंडखोरांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर या बैठकीत खलबतं झाली असून कायदेशीररित्या लढू असं पवारांना स्पष्ट केल्याचे समजते आहे. आज पहाटेपासून तिन्ही पक्षांतील महत्वाच्या नेत्यांनी या बैठकीसाठी सिल्व्हर ओकवर येऊन गेले आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सेनेचे अनिल परब आणि देसाई यांनीही पवारांची भेट घेतली आहे. या नेत्यांमध्ये सव्वातासांची बैठक पार पडली आहे.

दरम्यान, शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला दिला आहे. हा लढा महाविकास आघाडी कायदेशीर आणि एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १६ बंडखोरांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर या बैठकीत खलबतं झाली असल्याची माहिती मिळत आहे. या आमदारांविरोधात न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासंदर्भात शरद पवारांकडून सल्ला देण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. आता यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या