23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात क्रॉस वोटिंग नाही, २०० मते मिळविण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल

राज्यात क्रॉस वोटिंग नाही, २०० मते मिळविण्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्­ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राज्यात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना १८१ तर यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटतील व मुर्मू यांना २०० पेक्षा अधिक मते मिळतील, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेत्यांचा दावा फोल ठरला.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राज्यातील २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले होते. त्यातील ४ मते अवैध ठरली. २७९ आमदारांपैकी १८१ आमदारांनी मुर्मू यांना तर ९८ आमदारांनी सिन्हा यांना मतदान केले.

शिंदे-फडणवीस सरकारने १६४ मतांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मतदानाची गरज भासली नव्हती. नार्वेकर यांनी यावेळी मतदान केल्­याने १६५ मते झाली. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान न केलेल्या भाजपच्या मुक्ता टिळक यांनी यावेळी मतदान केले. म्हणजे १६६ मते शिंदे-फडणवीस सरकारकडे होती. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दिल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या १५ आमदारांची मते मिळून त्यांना १८१ मते मिळाली.

राष्ट्रवादीचे ५३, काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. यापैकी नवाब मलिक व अनिल देशमुख तुरुंगात असल्याने मतदान करू शकले नव्हते. त्यामुळे दोन काँग्रेसकडे असलेल्या ९५ मतांव्यतिरिक्त अन्य ३ अशी ९८ मते यशवंत सिन्हा यांना मिळाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रातून २०० मते देण्याचा दावा फोल ठरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या