18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइंडोनेशियामध्ये भूकंपात आतापर्यंत १६२ जणांचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये भूकंपात आतापर्यंत १६२ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपामुळे सोमवारी १६२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भूंकपात शंभरहून अधिक लोक जखमी झाले असून अनेक लोक बेपत्ता झाली आहेत. या भूकंपामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.४ इतकी होती. या भूकंपात अनेक इमारतीचं नुकसान झालं आहे.

भूकंपाचे हादरे सुरू झाल्यावर येथील स्थानिक रुग्णालयातून डॉक्टरांनी तातडीने रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र आणि जिओफिजिकल एजन्सीनुसार, भूकंपन झाल्यानंतर आणखी २५ भूकंपाचे झटके नोंदवले गेले आहेत. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रूग्णांना रूग्णालयातून सुखरूप बाहेर काढल्याने डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या दरम्यान, गंभीर रुग्णाच्या उपचारात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

भूकंपामुळे काही तास वीजपुरवठा खंडित होता. विजेअभावी वृत्तवाहिन्यांचे अपडेट्स मिळत नसल्याने घाबरलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, अजूनही २५ लोक ढिगा-याखाली अडकले आहेत. बचावकार्य रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, मृतांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. २००० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच ५००० हून अधिक लोकांना निर्वासित केंद्रात नेण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या