24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home दोन महिन्यात १७ हजार रिक्त पदे भरणार

दोन महिन्यात १७ हजार रिक्त पदे भरणार

- राज्यात दिवसभरात १२०० रुग्ण घरी जाण्याचा उच्चांक !

एकमत ऑनलाईन

मुंबई: प्रतिनिधी
रुग्णांच्या वाढीचा आकडा तर रोज वाढतोच आहे. पण या चिंतेच्या वातावरणात आज एक दिलासा देणारा आकडा पुढे आला. तो म्हणजे राज्यात आज कोरोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधीक संख्या असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात यश आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोन मध्ये बºयापैकी शिथीलता देण्यात आली असून खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्री टोपे यांनी आज जनतेशी संवाद साधला. पावसाळा तोंडावर आला असून कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरू करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करावेत यासाठी शासन आणि त्यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर तर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

Read More  विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्ट्रीने अंतीम सत्राच्या परीक्षा रद्द करा!

आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ञ, नर्स, कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील. त्यासाठी काल विभागाची सविस्तर बैठक झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक असणाºया मुलाखती देखील घेतल्या जातील आणि ही पदे भरले जातील, असे टोपे यांनी सांगितले. रुग्णांची खसगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला आणि त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधीकारीही नेमले आहेत.

राज्यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी साधनांची अजिबात कमतरता नाही. मुंबईत सध्या खाटांची कमतरता जाणवत आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. गेल्या काही दिवसंपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर उभारणी केली जात आहे. कोरोना केअर सेंटर या वर्गवारीमध्ये एक लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोना हेल्थ सेंटर वर्गवारीमध्ये अतिरिक्त १५ हजार खाटा तर अतिदक्षता विभागाच्या २००० खाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा घेण्यात येणार असून शासन निश्चित दराने उपचार तेथे केले जातील, असे टोपे यांनी सांगितले.

Read More  विना वॅक्सीन ‘हे’ औषध थांबवेल COVID-19 ला

राज्यात दिवसाला सुमारे १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी ६७ प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. राज्याचा मृत्यूदर हा ३.२ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्के आहे.मालेगावातील मृत्यूदर कमी होत आहे. तेथे खासगी दवाखाने बंद असल्याचा काळात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर तेथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांना विश्वासात घेतले त्यानंतर खासगी दवाखाने सुरू झाले. आता त्याचे परिणाम दसू लागले असून मृत्यू दर खाली आली आले.राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मालेगाव मध्ये टेली रेडीओलॉजी सुरू केली आहे. नागरिकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांप्रति आपली वर्तणूक चांगली ठेवावी. माणसाने माणाशी माणसाप्रमाणे वागावे ही आजची गरज असून कोरोना बाधीतांना हीन वागणूक देऊ नका. मुंबई, पुण्याहून येणाºया नागरिकांशी वागताना वर्तणुकीतली माणुसकी घालवू नका, असे आवाहनही टोपे यांनी केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या