26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस

महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस

एकमत ऑनलाईन

 नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

नाशिक : महाराष्ट्रात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत राज्यात सरारीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. तिथे सरासरीच्या ५३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी हवामान विभागाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात ८१४ मि.मी. पाऊस होत असतो, मात्र प्रत्यक्षात यावर्षी ९५७ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पूर्व विदर्भातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस, तर मुंबईत सरासरीच्या १५ टक्के कमी पाऊस
राज्यातील सांगली जिल्हा सोडता संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. सांगलीत सरासरीच्या २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाला आहे. सरासरीच्या ५३ टक्के अधिक पावसाची नोंद नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात झाली आहे.

त्यानंतर नांदेडमध्ये सरासरीच्या ५० टक्के अधिक पाऊस तर नागपुरात सरासरीच्या ४७ टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या ३० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या