28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयरेल्वेचे १९ अधिकारी बडतर्फ

रेल्वेचे १९ अधिकारी बडतर्फ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रेल्वेने आपल्या १९ अधिका-यांवर आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करीत बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्व अधिकारी रेल्वेच्या इतिहास विभागाचे होते. मोदी सरकारने खराब कामगिरी करणा-या अधिका-यांवर कारवाई केली आहे. या सर्वांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. या यादीत १० अधिकारी सहसचिव दर्जाचे आहेत.

कर्मचा-यांना काम करावे लागेल. काम न करणा-या कर्मचा-यांना घरी बसवले जाईल, असे रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मागच्या ११ महिन्यांत ९६ अधिका-यांना व्हीआरएस देण्यात आला आहे. मोदी सरकारने ही कारवाई केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन कायदा १९७२ ५६ जे आयच्या नियम ४८ अंतर्गत सरकारी अधिका-यांच्या वेळेच्या पुनरावलोकनाअंतर्गत केली आहे.

हे सर्व अधिकारी एमसीएफमध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर फ्रंट रेल्वे, सीएलडब्ल्यू, पूर्व रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, आरडीएसओ, ईडीसेल आणि उत्तर रेल्वेच्या पदांवर नियुक्त करण्यात आले होते. निवृत्त झालेल्या अधिका-यांमध्ये वैद्यकीय आणि सिव्हिलमधील प्रत्येकी तीन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलमधील प्रत्येकी चार, वाहतूक आणि मेकॅनिकल विभागातील प्रत्येकी एका अधिका-याचा समावेश असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या