32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात १९ हजार २१८ नवे रुग्ण, २ लाख ११ हजारांवर उपचार सुरू...

राज्यात १९ हजार २१८ नवे रुग्ण, २ लाख ११ हजारांवर उपचार सुरू !

सव्वा सहा लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.४:(प्रतिनिधी) राज्यात आज १९ हजार २१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर १३ हजार २८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण सव्वा सहा लाख रुग्ण बरे झाले असून २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात आज ३७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात पुन्हा आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदवला गेला. मुंबईत सर्वाधिक १९२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात १६८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४४ लाख ४४ हजार २४९ नमुन्यांपैकी ८ लाख ६३ हजार ०६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.३२ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ५१ हजार ३४३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत सुमारे २६ हजार लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

जळकोट तालुक्यात ‘आधार’ची सुविधा नसल्याने गैरसोय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या