24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय१९९३ चा बॉम्बस्फोट, ४ फरार आरोपी अटकेत

१९९३ चा बॉम्बस्फोट, ४ फरार आरोपी अटकेत

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : संपूर्ण मुंबईला हादरवणा-या १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील ४ फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली असून अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी ऊर्फ ​​शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चार फरार आरोपी दोन दशकांहून अधिक काळापासून वाँटेड होते. त्यांना दुबईतून डिपोर्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी आहे. अबू बकर हे कुटुंबासह मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीट येथे राहात होते. स्फोटानंतर तो परदेशात पळून गेला असून तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. आता त्याला अटक करण्यात आली. या सर्वांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने अनेकांची घरे उद्ध्वस्त केली. या बॉम्बस्फोटाशी संबधितांवर कारवायांचे सत्र अजूनही सुरूच आहे.

बनावट पासपोर्टद्वारे आले होते भारतात
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ४ फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संबधित चारही आरोपी १९९३ च्या स्फोटानंतर भारत सोडून फरार झाले होते. आता ते बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतात अहमदाबादमध्ये आले होते. गुजरात एटीएसला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत चौघांना अटक केली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या