25.4 C
Latur
Tuesday, May 18, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात कोविड संदर्भात 2 लाख 86 हजार गुन्हे - गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 86 हजार गुन्हे – गृहमंत्री अनिल देशमुख

एकमत ऑनलाईन

मुंबई दि. 21 : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 86 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले तर 33 कोटी 06 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात दि.22 मार्च ते 20 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,86,330 गुन्हे नोंद झाले असून 41,618 व्यक्तींना अटक करण्यात आली.96,596 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 33 कोटी 06 लाख 89 हजार 358 रु. दंड आकारण्यात आला.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 378 घटना घडल्या. त्यात 902 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर- 1 लाख 14 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,14,065फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,596 वाहने जप्त करण्यात आली.

कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 244 पोलीस व 26 अधिकारी अशा एकूण 270 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

नागरिकांचा सहभाग
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील टीआरपी प्रकरणाचा तपास विद्युतवेगाने सीबीआयकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या