21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमिग-२१ कोसळले, २ पायलटचा मृत्यू

मिग-२१ कोसळले, २ पायलटचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

राजस्थानमधील बाडमेर येथे अपघात
जयपूर : राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास मिग-२१ लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळताच जवळपास अर्धा कि.मी. अंतरावर त्याचे तुकडे पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विमानाला आग लागली. या दुर्घटनेत २ पायलटही ठार झाले आहेत. ही दुर्घटना बाडमेरच्या बायतू क्षेत्रातील भीमडा गावात घडली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

एअरफोर्सचे विमान मिग-२१ भीमडा गावाजवळून उड्डाण घेत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि वायूसनेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे २ पायलट जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ते दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती आहे. विमानाचे पायलट नेमके कोण होते, याची माहिती समोर आलेली नाही.मिग-२१ कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी भारताचे हवाई दलप्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्याशी चर्चा केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या