23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात एसआरपीएफच्या २ तुकड्या दाखल

पुण्यात एसआरपीएफच्या २ तुकड्या दाखल

एकमत ऑनलाईन

पुणे : सध्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप सुरू आहेत. एक झाला की एक हादरा जनतेला, राजकीय पक्षांना सगळ्यांनाच बसतोय. रोज एका ठिकाणी आंदोलन, मोर्चे, कुणाचे ना कुणाचे कार्यालय फोडणे हे सत्र सुरू आहे. या सगळ्या गदारोळात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे पुण्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता २ एसआरपीएफच्या तुकड्या दाखल झालेल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयात या दोन्ही तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

शहरात कुठेही कायदा- सुव्यवस्था बिघडली तर या तुकड्यांना पाचारण करण्यात येणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याची पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे.

मुक्कामाचे ठिकाणसुद्धा गुप्त

महाराष्ट्रातील राजकारणासाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र पाठवले आहे. उद्याच बहुमत सिद्ध करण्यास देखील सांगितले आहे. बंडखोर आमदार गुवाहाटीला असतानाच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांची कार्यालये फोडली.

कुणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ तर कुणी विरोधात मोठी आंदोलनं केली त्यामुळे आता जेव्हा बहुमत चाचणीत सहभागी होण्यासाठी हेच बंडखोर आमदार मुंबईत दाखल होत आहेत तेव्हा त्यांनी आपल्या मुक्कामाचं ठिकाणसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवलेलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या