19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeदिल्लीत ८३ परदेशी तबलिगींविरोधात २० चार्जशीट

दिल्लीत ८३ परदेशी तबलिगींविरोधात २० चार्जशीट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
लॉकडाऊन दरम्यान अनेक दिवस वादात राहिलेल्या निझामुद्दीन मरकझ प्रकरणात दिल्ली पोलिसांनी परदेशी तबलिघी जमात कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली आहे़ दिल्लीच्या साकेत कोर्टात पोलिसांनी तबलिघी जमातच्या ८३ परदेशी सदस्यांविरोधात २० पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे़ या आरोपपत्रात या सदस्यांविरोधात ५ कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत. उल्लेखनीय म्हणजे, आरोपपत्र दाखल नसेल तर परदेशी नागरिकांना देशात रोखता येऊ शकत नाही. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी आपली कारवाई गतीने पूर्ण केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य चार्जशीट तबलीघी जमातचा अध्यक्ष मौलाना साद आणि त्याच्या सहकाºयांविरोधात दाखल करण्यात आली आहे़ परदेशी तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात पोलिसांनी त्यांच्यावर व्हिसा नियमांच्या उल्लंघनाशिवाय अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊन धार्मिक उपक्रमांत सहभागी होत व्हिसा नियमांच्या उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे़ याशिवाय त्यांच्यावर कलम १४४ च्या उल्लंघनाचा आरोपही करण्यात आला आहे़ त्यांच्यावर कलम १८८ नुसारही आरोप जोडण्यात आलेत. शिवाय महामारी कायद्याच्या कलम २१७ नुसारही आरोप दाखल करण्यात आलेत.

Read More  कोरोना रूग्णाच्या डब्यात दारू आणि पत्ते, रूग्णाचा हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न!

मार्च महिन्यात तबलीघी जमातच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय दिल्ली स्थित निझामुद्दीन मरकजमध्ये ६७ देशांतील २०४१ तबलिघी सहभागी झाले होते. यामध्ये ९१६ जणांना दिल्ली पोलिसांनी मरकझमधून काढून क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयात दाखल केले होते़ काही परदेशी तबलिघी त्यापूर्वीच देशातील वेगवेगळ्या भागांत दाखल झाले होते. तिथे संबंधित राज्य पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली. उत्तर प्रदेशात यापूर्वीच काही परदेशी तबलिघी जमातीच्या सदस्यांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे़ दिल्लीत मोठ्या प्रमाणात परदेशी तबलिघी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. उपचारानंतर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते़ यातील अधिक जणांची दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चकडून चौकशी करण्यात आली आहे़

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या