27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयकोलकात्यात ईडीच्या हाती लागले २० कोटी रोकडीचे घबाड

कोलकात्यात ईडीच्या हाती लागले २० कोटी रोकडीचे घबाड

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने आज छापे टाकले. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या छापा सत्रातून एजन्सीच्या हाती जवळपास २० कोटी रुपयांची रोकड लागली. जप्त करण्यात आलेल्या नोटांचा फोटो ईडीने ट्विट केला आहे. पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन आणि बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्ड भरती घोटाळ्याचा तपास करण्यासाठी टाकण्यात आलेल्या छाप्यांची माहिती ईडीने ट्विट करून दिली आहे.

शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी आज पश्चिम बंगालच्या दोन मंत्र्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे सात-आठ अधिकारी सकाळी साडे आठ वाजता चॅटर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. दुपारी ११ पर्यंत त्यांनी छापे टाकले. यावेळी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान चॅटर्जी यांच्या घराबाहेर तैनात होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या आणखी एक पथक कुचबिहार जिल्ह्यातल्या मेखलीगंजमधील अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली. त्यांनी अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. शहरातील जादवपूर परिसरात असलेल्या पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डाचे माजी अध्यक्ष माणिक भट्टाचार्य यांच्या घरावरही अधिकाऱ्यांना छापे टाकले.

पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधील क आणि ड वर्गातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यांची दखल उच्च न्यायालयानं घेतली. यानंतर सीबीआयनं प्रकरणाचा तपास हाती घेतला. या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय आहे. त्यामुळे ईडीनंदेखील कारवाई सुरू केली असून अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या