त्रिपोली : लीबीयामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या डेरमा शहराला पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अवघ्या काही मिनीटात अनेक मोठ्या इमारती वाहून गेल्या, शेकडो कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. लीबियात आलेल्या भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लीबियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आपत्ती असून यात मृत्यू झालेल्या लोकांचेही मृतदेहही सापडत नाहीत.
दरम्यान, लीबियातील पुरस्तिथीत बचाव कार्य करत असलेल्या लोकांचे लोकांनी दिलेलल्या माहितीनुसार, समुद्राचे पाणी शहरात शिरले आणि त्याच्या पाण्यासह बरेच लोक वाहून गेले. यातील बहुतेकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात असले तरी मृतदेह शोधणे कठीण होत आहे. लीबियातील डेरना शहराचा जवळपास अर्धा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनाम अल-घाइठी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, शहरातील मृतांचा आकडा १८ ते २० हजारांवर पोहोचला आहे. इतकेच नाही तर आता महामारी पसरण्याची मोठी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पाण्यात सडत असून पाण्यासह रस्त्यावर घाण वाहत आहे. त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, जागतिक हवामान संघटनेचे म्हणणे आहे की, लीबियातील इतके मृत्यू टाळता आले असते. लीबियात गेल्या दशकभरापासून यादवी युद्ध सुरू असून तेथे दोन वेगवेगळी सरकारे प्रशासन चालवत आहेत. देशात हवामान विभाग देखील कार्यरत नाही.
कित्येक कुटुंबातील एकही सदस्य जीवंत राहिला नाही. शहरात मृतदेहांचे सामुहिक दफन करण्यात येत आहे. जेसीबीच्या मदतीने कबरी खोदल्या जात आहे. आफ्रिकेतील देश लीबिया मागील १० वर्षांपासून गृहयुद्धाने होरपळून निघाला आहे. त्यानंतर आता पूरामुळे देशातील परिस्थीती गंभीर बनली आहे.