22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeचक्रीवादळापूर्वीच शहरात पडली २० झाडे

चक्रीवादळापूर्वीच शहरात पडली २० झाडे

एकमत ऑनलाईन

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) चार पथके जिल्ह्यात दाखल

पिंपरी – थोड्याच वेळात निसर्ग चक्रीवादळ अलिबाग जवळील समुद्र किनाऱ्यावर धडक देणार आहे. मात्र त्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार वारे आणि रिमझिम पाऊस पडत आहे. वाऱ्यामुळे शहरातील २० झाडे पडली आहेत.

मंगळवारी (दि. २) दुपारपासूनच पिंपरी चिंचवड शहरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून कोसळत आहेत. तर रात्रीपासून सुसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची संततधार सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकूण २० झाडे पडली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त झाली आहे. मंगळवारपासून दिवसा पडलेली १५ झाडे ही उद्यान विभागाकडून हटविण्यात आली आहेत. तर उर्वरित पाच झाडे रात्रीच्या वेळी पडली आहेत.

Read More  प्रियकराने फसवल्यामुळे कन्नड अभिनेत्री चंदनाने केली राहात्या घरी आत्महत्या

रायगड  जिल्ह्यातील 11 हजार 260 हजार नागरिक सुरक्षित स्थळी

कोरोना पाठोपाठ अरबी समुद्रकिनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्याला मोठा असल्याने कालपासूनच जिल्ह्यातील 11 हजार 260 हजार नागरिकांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळा, मंगल कार्यालय, समाजमंदिरांमध्ये हलवण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत.

जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून निसर्ग चक्रीवादळ हे अलिबाग समुद्रकिनारी येणार असल्याचे समजताच प्रशासनाकडून वेगवान हालचाली करण्यात आल्या. एकट्या अलिबाग तालुक्यात एनडीआरएफच्या तीन तुकड्या आल्या असून त्यांनी समुद्र किनारी गावातील परिस्थितीची पाहणी केली आहे. अलिबाग तालुक्यातील 4 हजार 407, पेण 87, मुरुड 2 हजार 407, उरण 1 हजार 512, पनवेल 55, श्रीवर्धन, 2553, म्हसळा 239 अशा 11 हजार 260 नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या नागरिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या