27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रकृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटींचे आरोप

कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटींचे आरोप

एकमत ऑनलाईन

 

पत्र खोटे, काही व्यक्तींनी षडयंत्र रचल्याचा खुलासा
मुंबई : पिंपरी चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारेपत्र व्हायरल झाले. यानंतर सध्या मुंबईचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम करत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी संबंधित पत्र खोटे असल्याचे म्हटले. तसेच आपल्या विरोधात काही व्यक्तींनी षडयंत्र केल्याचा आरोपही केला.

दुसरीकडे आरोप करण्यात आलेल्या पत्रावर ज्या पोलिस अधिका-यांचे नाव आहे, त्या अधिका-यानेदेखील आपले नाव वापरून खोटी सही करून पोलिस विभागाची बदनामी केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांकडे केली. या आरोपांवर बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, माझ्यावरील आरोप हे काही व्यक्तींनी केलेले षडयंत्र आहे. मी चुकीचे काहीही केलेले नाही. हे पत्र खोटे आहे. पत्र खोटे असल्याचे एपीआय अशोक डोंगरे यांनीदेखील सांगितले आहे. तशी तक्रार केली आहे.

आपल्या नावाचा गैरवापर केला
दुसरीकडे व्हायरल पत्राद्वारे ज्या पोलिस अधिका-याच्या नावाने कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करण्यात आले त्या अधिका-याने हे पत्र खोटे असल्याचे, आपल्या नावाचा गैरवापर करून खोटी सही केल्याचा आरोप केला. तसेच याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या