कोरोनामुळे भीतीचे वातावरण : एकूण रुग्णसंख्या ३२९५ वर
पुणे : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. तरी पण महाराष्ट्रात शनिवारी १६०६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आज ३० हजार ७६ इतकी झाली आहे, तर दुसरीकडे राज्यातील करोनाच्या हॉटस्पॉटपैकी एक असणाऱ्या पुणे शहरात दिवसभरात २०२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आजवरची सर्वाधिक वाढ आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३२९५ झाली आहे. तर मृतांची संख्या १८५ झाली आहे.
Read More ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीचे माकडांवर सकारात्मक परिणाम; आता मानवांवर चाचणी
शनिवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २०२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ९६ तर खासगी रुग्णालयांमध्ये ९९ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १०८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शनिवारी राज्यात ५२४ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.