27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीय८ वर्षांत २२ कोटी अर्ज, फक्त ७ लाख नोक-या

८ वर्षांत २२ कोटी अर्ज, फक्त ७ लाख नोक-या

एकमत ऑनलाईन

बेरोजगारीचा उच्चांक, मोदी सरकारचे वार्षिक २ कोटी रोजगाराचे आश्वासन हवेतच

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा आम्ही दोन कोटी नोक-या देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्णत: हवेत विरल्याचे केंद्र सरकारच्याच आकडेवारीने उघड झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून देण्यात आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. ८ वर्षात नोक-यांसाठी देशातील २२ कोटी तरुणांनी अर्ज केले. मात्र, केवळ ७ लाख २२ हजार एवढ्याच नोक-या मिळाल्या. त्यामुळे बेरोजगारीने उच्चांक गाठला.
शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून देशातील करोडो तरुण प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन स्वत:ला तयार करत आहेत. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न पडला आहे. कारणही तसेच आहे. देशात एकीकडे उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे शासकीय नोक-या कमी होत आहेत. २२ कोटींच्या अर्जामागे मागच्या ८ वर्षात केवळ ७ लाख २२ हजार एवढ्याच नोक-या सरकार देऊ शकले आहे. हे आम्ही सांगत नाही तर लोकसभेत केंद्रीय पीएमओ, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकभेत एका लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली.
आज देशात आणि राज्यात असंख्य उच्चशिक्षित तरुण घरदार सोडून बिकट परिस्थितीत नोकरीसाठी परीक्षेची तयारी करत आहे. मात्र, उच्च शिक्षण घेऊनही शेवटी नोक-या नसल्याने मुलींना तर लग्न करून संसाराला लागावे लागते, तर तरुणांना उच्च शिक्षण घेऊन मिळेल ते काम करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. दरम्यान एकीकडे राज्यातील तसेच केंद्र सरकारच्या असंख्य कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी निवृत्तीनंतर जागा न भरल्या गेल्याने तिथे काम करत असलेल्या अधिका-यांवर कामाचा बोजा वाढत चालला आहे तर दुसरीकडे सरकार भरती प्रक्रिया राबवत नसल्याने करोडो तरुण-तरुणी बेरोजगार राहात आहेत. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करून आता तरी भरती प्रक्रिया राबवून या तरुणांना न्याय देणे गरजेचे आहे.

८ वर्षांतील बेरोजगारीचे चित्र

वर्ष                नोक-या                    अर्ज

२०१४-१५     १ लाख ३० हजार           २ कोटी ३२ लाख
२०१५-१६     १ लाख ११ हजार           २ कोटी ९५ लाख
२०१६-१७     १ लाख १ हजार            २ कोटी २८ लाख
२०१७-१८      ७६ हजार १४७             ३ कोटी ९५ लाख
२०१८-१९     ३८ हजार १००              ५ कोटी ९ लाख
२०१९-२०     १ लाख ४७ हजार          १ कोटी ७८ लाख

२०२०-२१     ७८ हजार ५५५             १ कोटी ८० लाख
२०२१-२२     ३८ हजार ८५०             १ कोटी ८७ लाख
………………………………….
एकूण नोक-या ७ लाख २२ हजार आणि अर्ज २२ कोटी ५ लाख

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या