27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयनक्षली हल्ल्यात २२ जवान शहीद; १४ जवानांचे मृतदेह सापडले, ९ नक्षल्यांचा...

नक्षली हल्ल्यात २२ जवान शहीद; १४ जवानांचे मृतदेह सापडले, ९ नक्षल्यांचा खात्मा

एकमत ऑनलाईन

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील विजापूरमध्ये शनिवार दि. ३ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले असल्याची माहिती रविवारी समोर आल्याने देश हादरला आहे. दरम्यान, आतापर्यंत १४ सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेत ३२ जवान जखमी झाले आहेत. विजापूरमधील तार्रेम भागात जोनागुडा टेकड्यांजवळ नक्षलवाद्यांनी सुमारे ७०० जवानांना घेरले होते. यानंतर झालेल्या तीन तासांच्या चकमकीत ९ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. या घटनेत सुमारे ३० जवान जखमी झाले आहेत.

सुरक्षा दलांनी जोनागुडाच्या टेकड्यांवर तळ ठोकल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शुक्रवारी रात्री सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोज, सीआरपीएफ बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी कारवाई सुरू केली, परंतु शनिवारी नक्षलवाद्यांनी ७०० जवांनाना घेराव घातला आणि तीन बाजूंनी गोळीबार केला. पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज म्हणाले की, कोंटा क्षेत्र समिती, पामहेड क्षेत्र समिती, जागरगुंडा क्षेत्र समिती आणि बासागुडा क्षेत्र समितीचे १८० नक्षलवादी व्यतिरिक्त सुमारे २५० नक्षलवादी होते. नक्षलवाद्यांनी मृतदेह दोन ट्रॅक्टरमध्ये नेल्याची माहिती मिळाली आहे.

मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तविली होती
विजापूर-सुकमा जिल्ह्यातील सीमाभाग हा नक्षल्यांचा अड्डा आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांची बटालियन असून बरेच प्लाटून येथे नेहमीच तैनात असतात. या संपूर्ण भागाची जबाबदारी नक्षलवादी सुजाथा या महिलेच्या ताब्यात आहे. जवानांवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला होण्याची शक्यता अधिका-यांनी वर्तविली होती. त्यामुळे संपूर्ण भागात दोन हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले होते.

सीआरपीएफचे डीजी छत्तीसगडमध्ये दाखल
सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग छत्तीसगडला पोहोचले आहेत. यावेळी ते परिस्थितीचा आढावा घेतील. विजापूरमध्ये कारवाईनंतर गृह मंत्रालयाने त्यांना त्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. गृहमंत्री अमित शहा विजापूरला डीजी पाठवण्याबरोबर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.

पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या हुतात्म्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. शूर हुतात्म्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. जखमींनी लवकरच बरे होण्यासाठी मनोकामना.

आसाम दौरा अर्धवट सोडून अमित शहा दिल्लीला
छत्तीसगडच्या सुकमामध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी जवानांना वेढा घालून भीषण हल्ला केला होता. प्रारंभी यात ५ जवान शहीद झाले होते. तर मोठ्या संख्येने जवान जखमी झाले होते.मात्र रविवारी शहीद जवानांची संख्या वाढून २२ वर गेल्यानंतर चित्र चिंताजनक झाले आहे. परिणामी आसामच्या निवडणुक प्रचार दौ-यावर असलेले केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला प्रचार दौरा अर्धवट सोडला असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. गृहमंत्री अमित शहा हे दुपारी उशिरा दिल्लीत दाखल होतील. यानंतर छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा आढावा ते घेणार आहेत, अशी माहिती आसाम निवडणुकीतील भाजपचे सहप्रभारी जितेंद्र सिंह यांनी दिली.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांवर भाजपची टीका
दरम्यान छत्तीसगडमध्ये भीषण नक्षलवादी हल्ला झाला असताना मुख्यमंत्री भूपेश बघेल मात्र आसाममध्ये निवडणुकीच्या प्रचारात आहेत. यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेला यांना जवानांच्या बलिदानाची पर्वा नाही, अशी टीका मंगलदोईचे भाजप खासदार दिलीप सैकिया यांनी केली आहे.

राष्ट्रपतींकडून हल्ल्याचा निषेध
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या नक्षलवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा गंभीर इशारा नक्षलवाद्यांना दिला आहे.

दोन फेक एन्काऊंटरचा होता प्लॅन; गूढ उलगडणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या