28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्र२२ हजार कोटींचा घोटाळा, एबीजी शिपयार्डच्या माजी अध्यक्षाला अटक

२२ हजार कोटींचा घोटाळा, एबीजी शिपयार्डच्या माजी अध्यक्षाला अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ््याप्रकरणी सीबीआयने एबीजी शिपयार्डचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांना २२,८४२ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. हा देशातील बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा मानला जातो.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड ही एबीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे जहाजांची निर्मिती आणि दुरुस्तीचे काम करते. एबीजी शिपयार्ड लिमिटेडची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली असून, आतापर्यंत या कंपनीने १६५ हून अधिक जहाजांची निर्मिती केली आहे. मात्र, एकेकाळची भारतातील सर्वांत मोठी खाजगी शिपयार्ड कंपनी आता कर्जबाजारी झाली आहे.

स्टेट बँकेने केलेल्या तक्रारीनुसार कंपनीने बँकेकडून २,९२५ कोटी रुपये, आयसीआयसीआय बँकेकडून ७,०८९ कोटी रुपये, आयडीबीआय बँकेकडून ३,६३४ कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाकडून १,६१४ कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून १,२४४ कोटी रुपये, तर इंडियन ओव्हरसीज बँकेकडून १,२२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, त्याचा वापर ज्या कारणासाठी दाखविण्यात आला होता. तेथे खर्च न करता इतर ठिकाणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कंपनीला २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून क्रेडिट सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये एसबीआयचे एक्सपोजर २४६८.५१ कोटी इतके होते.

५ वर्षे सुरू होता
फसवणुकीचा खेळ
१८ जानेवारी २०१९ रोजी अर्नेस्ट अँड यंगने सादर केलेल्या फॉरेन्सिक ऑडिट अहवालातून (एप्रिल २०१२ ते जुलै २०१७) आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बेकायदेशीर प्रकार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भांडवल वळवणे, अनियमितता, गुन्हेगारी विश्­वासाचा भंग आणि बँकांकडून घेतलेले पैसे मूळ कारणासाठी न वापरता इतर कारणांसाठी वापरणे यांचा समावेश आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या