28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeऔरंगाबादमराठवाड्याची २२० कोटी वीज बिल थकबाकी

मराठवाड्याची २२० कोटी वीज बिल थकबाकी

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : ग्राहकांनी नियमित दरमहा बिलाचा भरणा न केल्याने महावितरणला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर उभा राहत आहे. मराठवाड्यात ५० हजार रूपयांपेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी असलेल्या ३०५१ ग्राहकांकडे २२० कोटी ४ लाख ८१ हजार रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूलीसाठी महावितरणचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

विशेष पथक ग्राहकांकडे असलेले वीज बिल वसूल करणार आहे. वीज बिल न भरणा-या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई पथकाकडून करण्यात येत आहे. ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

५० हजारांपुढील थकबाकी असणा-यांवर लक्ष
वीज बिल वसूलीसाठी महावितरणकडून विविध माध्यमातून जनजाग्रती करण्यात येते. तरीही काही ग्राहक वापरलेल्या विजेचे दरमहा वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. सूचना, नोटिसा, विनंत्या करूनही वीजबिल भरत नाहीत. थकीत बिलामुळे महावितरणची थकबाकी वाढतच जाते. ५० हजार ते ५ लाखापेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी असणा-या ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसाठी महावितरणचे विभागीय कार्यालय, मंडल कार्यालय व परिमंडल कार्यालयातील सहा कर्मचा-यांचे विशेष पथक औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आले आहे.

सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन
पथक थकबाकी असणा-या ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी वसूली करत आहे. अन्यथा थकबाकी न भरणा-या ग्राहकांची कोणतीही सबब न ऐकता तातडीने वीज पुरवठा करण्याची कार्यवाही करत आहेत. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
परिमंंडळ ग्राहक थकबाकी लाख रूपये
औरंगाबाद ३२८० २९८१.०९
लातूर २९५३ २३४५.७२
नांदेड २३८१८ १६६७८.००
एकूण ३००५१ २२००४.८१

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या