21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीय26 भक्त पॉझिटिव्ह : हातावर पप्पी देऊन भक्तांना बरे करणार्‍या बाबाचा मृत्यू

26 भक्त पॉझिटिव्ह : हातावर पप्पी देऊन भक्तांना बरे करणार्‍या बाबाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

…जाता जाता बाबामुळे 26 भक्तांनाही कोरोनाची झाली लागण : प्रशासनाने झाडून सर्व बाबांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये एक भोंदू बाबा भक्तांना त्यांच्या हातावर पप्पी घ्यायचा आणि त्यामुळे भक्त बरे व्हायचे असा दावा करायचा. या बाबाला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. जाता जाता बाबामुळे 26 भक्तांनाही कोरोनाची लागण झाली आहे

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एक भोंदू बाबा होता. तो आपल्या भक्तांच्या हाताचे चुंबन घ्यायचा, तावीज द्यायचा आणि त्यामुळे लोक आजारातून बरे होतात असा दावाही तो करत होता. या बाबाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला. तेव्हा या बाबामुळे 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले.

Read More  मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग; अग्निशमनदलाच्या 6 गाड्या दाखल

एका बाबामुळे एवढे कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाने झाडून सर्व बाबांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले. क्वारंटाईन सेंटरमध्ये आम्हाला योग्य सुविधा मिळत नसल्याची तक्रार या बाबांनी केली आहे. तसेच सगळी कामे बंद करून आम्हाला इथे कोंडून ठेवल्याचेही या बाबांनी सांगितले.

एका बाबाचा कोरोनामुळे मृत्यू झाला म्हणून सर्व बाबांना क्वारंटाई करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच या बाबांना सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या असून त्यांची कोरोना टेस्ट केली आहे, त्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याए अधिकार्‍यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या