नांदेड: प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पंजाब भवन व डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील २५ जणांना कोरोनामुक्त झाले, असून या सर्वांना गुरूवारी सुट्टी देण्यात आली आहे.तर बुधवारी एकाला सुट्टी देण्यात आली होती़नांदेडात आत्तापर्यंत २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ मात्र अजून तिन नव्या रूग्णांची भर पडली आहे़ यामुळे कोरोना रूग्ण संख्या ६६ वर पोहचली आहे़दरम्यान कोरोना मुक्त व्यक्तिंना पुढचे सात दिवस निगराणीखाली राहावे लागणार असून त्यांची आरोग्य यंत्रणेकडून रोज संर्पक केला जाणार आहे .
नांदेड जिल्ह्यात विविध भागात व गुरुद्वारा परिसरातील एकूण ६६ रुग्ण हे कोरोना आजाराने बाधित असतांना या रुग्णांवर उपचार करणाºया वैद्यकीय पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे यात्री निवास नांदेड येथील २२ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील ३ रुग्ण हे कोरोना आजारातून आज मुक्त झाली आहेत. नांदेड जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळत असून आतापर्यंत कोरोनामुक्त एकुण २६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त होऊ परतणाºया रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नांदेड जिल्ह्यासाठी ही दिलासा देणारी बाब असून यशस्वी उपचारमुळे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत पुढे वाढ होण्यास मदत होईल.
Read More उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड
कोरोना विषाणु संदर्भात गुरुवार १४ मे रोजी सायं. ५ वा. प्राप्त १२६ अहवालानुसार यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील नवीन ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर १२१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असून २ स्वॅब तपासणी अहवाल नाकारण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १लाख ५ हजार ९४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील २ हजार ३०२ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी १ हजार ९९९ स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून २०० व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. प्रलंबित असलेल्या १२६ जणांचे अहवाल गुरुवार दि. १४ मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाले आहेत. यामध्ये तीन जणांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले तर १२१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ६६ इतकी झाली आहे. उर्वरीत पॉझिटिव्ह ८ रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे २४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून हे रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या अॅपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.