25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयबसमधून पकडली २६ क्विंटल चांदी

बसमधून पकडली २६ क्विंटल चांदी

एकमत ऑनलाईन

जयपूर : राजस्थानमधील मेवाड परिसरात चांदीची तस्करी जोरात सुरू आहे. चांदीच्या तस्करीच्या तारा गुजरातशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. मेवाडमधील डुंगरपूर आणि उदयपूर जिल्ह्यात तीन दिवसात सुमारे २६ क्विंटल चांदीचे दागिने आणि अंगठ्या पकडण्यात आल्या आहेत. ही चांदी एका खासगी बसमध्ये नेली जात होती.

दोन्ही जिल्ह्यात जप्त केलेल्या चांदीचा बाजारभाव कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तीन दिवसात दुस-यांदा एकाच बसमधून चांदीची तस्करी होत असल्याचे लक्षात आले आहे. डुंगरपूर जिल्ह्यात, बिछीवाडा पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत आग्राहून गुजरातला जाणा-या ट्रॅव्हल्स बसमधून १३२१ किलोपेक्षा जास्त किंमतीची चांदी पकडली. बसमध्ये तळघर करून ही चांदी भरण्यात आली. पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या