36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयदिल्ली अग्निकांडात सकाळपर्यंत २७ मृतदेह हाती

दिल्ली अग्निकांडात सकाळपर्यंत २७ मृतदेह हाती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भीषण आगीचा घटना घडल्याचं समोर आलं आहे. तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील ही इमारत आहे. या इमारतीच्या तिस-या मजल्यावर कोणी अडकून पडले आहे का? याचा शोध घेतला जात आहे. ३० अग्मिशमन गाड्यांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले आहे.

दिल्लीच्या अग्मिशमनदलाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले, सध्याकाळी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील या तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला आग लागली. सध्या युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम सुरु असून अद्याप २७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. आग विझविण्यात आली असून अद्याप बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान, काहीवेळापूर्वी दिल्लीचे डीसीपी समीर शर्मा यांनी माहिती दिली की, १५ अग्मिशमन दलाचे बंब आग विझवण्याठी घटनास्थळी दाखल झाले असून या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटली नसून बचावकार्य सुरुच आहे. या भीषण आगीतून ५० ते ६० लोकांना वाचविण्यात यश आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या