चिंतेत टाकणारी बाब : जिल्ह्यात आतापर्यंत 40 जणांचा कोरोनामुळं मृत्यू
सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत चालली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 28 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं कोरोनाग्रस्तांची संख्या 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
Read More रावणकोळा येथील आई व मुलगा पॉझिटिव्ह
चिंतेत टाकणारी बाब म्हणजे आजच्या दिवशी 6 रुग्णांचा कोरोना आजारानं बळी गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 40 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. तसेच आजवर 224 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.