22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रधुळे जिल्ह्यात २९० बोगस डॉक्टर

धुळे जिल्ह्यात २९० बोगस डॉक्टर

एकमत ऑनलाईन

धुळे : गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात तब्बल २९० बोगस डॉक्टरांची यादी प्रशासनाकडे असून, देखील गेल्या आठ महिन्यात फक्त पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक जण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.

धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात २९० बोगस डॉक्टर असल्याचे समोर आलं आहे. मात्र, यातील अनेक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाला या बोगस डॉक्टरांबदल्ल माहिती असून देखील कारवाई करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाह.

त्यामुळं हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र, जिल्ह्यात अनेकजण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं समोर आले आहे. यामुळं अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचे समोर आलं आहे. अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषधे देत असल्याने यामुळं अनेकांना गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागला आहे. तसेच रुग्णांना यामुळं धोका देखील निर्माण होऊ शकतो.

कारवाईसाठी पुनर्विलोकन समिती स्थापना
दरम्यान बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडं जिल्ह्यातील २९० बोगस डॉक्टरांची यादी आहे. यातील फक्त पाच डॉक्टरांवर आत्तापर्यंत कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे या समितीच्या कोणत्याही बैठका वेळेवर होत नसल्याचे देखील समोर आलं आहे.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करावी असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. मात्र अद्यापही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीनं जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या