धर्माबाद :प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील केरुर येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेला धमार्बाद शहरात एका वाहनचालकास व त्याची पत्नी,मुलास येथील माहेश्वरी भवन मध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी पहाटे ठेवण्यात आले़तिघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्यामुळे शहरातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे.
धमार्बाद येथील साठेनगर मधील रहिवाशी असलेला वाहन चालक रविवारी नर्सी मार्गे धमार्बादकडे वाहन घेऊन येत असताना वाटेतच नर्सी येथे बिलोली तालुक्यातील केरुर येथील एका युवकस आपल्या वाहनात बसवून बिलोली येथे सोडले. तो युवक कोरोना पाझिटिव्ह निघाला आहे.त्यास विचारपुस केल्यानंतर समजले आहे की धमार्बाद येथील एका वाहनात बसून बिलोली येथे आला आहे.|
Read More शोएबला कमी बोलण्याची सवय : सानिया
लगेच सदरील माहिती येथील तहसिलदार शिंदे यांना मिळताच त्यांनी आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनास कळविले.गुरूवारी रात्री शहरातील साठेनगर येथे तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी जाऊन सदरील युवकास येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.व शुक्रवारी पहाटे येथील माहेश्वरी भवन मध्ये असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये सदरील युवक व त्याची पत्नी,मुलास क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल, तहसिलदार शिंदे यांनी सांगितले आहे.