37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeकुपवाड्यात ३ दहशतवाद्यांना पकडले

कुपवाड्यात ३ दहशतवाद्यांना पकडले

- दहशतवाद विरोधी दिनी मोठे यश

एकमत ऑनलाईन

कुपवाडा (जम्मू-काश्मीर): वृत्तसंस्था
दहशतवादविरोधी दिनाच्या दिवशी आज सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे तीन अतिरेक्यांना जीवंत पकडण्यात यश मिळवले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांची चौकशी सुरूच आहे. या दहशतवाद्यांकडून अनेक महत्त्वाचे खुलासे होतील, असे म्हटले जात आहे. ही दहशतवादविरोधी मोहीम लष्कराच्या २८ आरआरने यशस्वी केली.

Read More  फुटीरवादी नेत्याच्या दहशतवादी मुलाला कंठस्नान

कुपवाडा येथील सोगम परिसरातील वनक्षेत्रात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर तत्काळ जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, या कारवाईत तिन्ही दहशतवादी पकडले गेले. काही दिवसांपूर्वी या तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सुरक्षा दल सतर्क झाले होते.
यावेळी दहशतवादविरोधी दिन बंद खोलीत दरवर्षी २१ मे रोजी दहशतवादविरोधी दिन साजरा केला जातो. यावर्षी मात्र कोरोनामुळे हा दिन बंद खोलीत साजरा केला जात आहे. या दिवशी कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक उपाय केले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार २१ मे रोजी सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अन्य सार्वजनिक संस्थांमध्ये दहशतवादाचा निषेध करण्याची प्रतिज्ञा दिली जाण्याची शक्यता आहे.

हा दिन साजरा करण्यात सहभागींना आणि संयोजकांना सुरक्षेच्या दृष्टीने आणि कोरोना साथीच्या दृष्टीने सार्वजनिक सभा टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह अधिकाºयांना त्यांच्या राहत्या ठिकाणी किंवा कार्यालयांमध्ये दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या