Thursday, September 28, 2023

पूनम महाजन यांच्यातर्फे अग्नी योद्ध्यांना ३ हजार पीपीई किट्स

मुंबई : राज्यात सध्या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कामगिरी बजावत आहेत. मुंबईवर संकट कोसळल्यावर धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना तीन हजार पीपीईचे वाटप करण्यात आले आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांची गरज ओळखून ही मदत केली आहे.

कोरोनाच्या संकटात मुंबईवर ओढावणाऱ्या संकटांत अग्निशमन दल आपली भूमीका चोख बजावतात. एखाद्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर काही क्षणांत पोहोचवण्याची क्षमता या दलाने लॉकडाऊनच्या काळातही कायम ठेवली आहे. कोरोनाच्या सावटात जागोजागी निर्जंतूकीकरणाची जबाबदारीही अग्निशमन दलाने बजावली.

मुंबईत मदतकार्य करत असताना या अग्नी योद्ध्यांना कोरोनाची बाधा होण्याची भीती आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पूनम महाजन यांनी वांद्रे अग्निशमन केंद्रात या किट्सचे वाटप केले. “अग्निशमन दलाबद्दल एक विशेष आपलेपणा कायम राहिला आहे.”, अशा भावना पूनम महाजन यांनी व्यक्त केल्या. यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगडाळे उपस्थित होते. या उपक्रमासाठी युपीएल लिमिटेडचे सहकार्य लाभले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या