26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeतब्बल ३०४ कोरोना अहवाल प्रलंबित

तब्बल ३०४ कोरोना अहवाल प्रलंबित

शुक्रवारी दिवसभर एकही अहवाल आला नाही, धाकधूक वाढली

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
संशयित रूग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी प्रयोेगशाळेकडे पाठविण्यात आलेले तब्बल ३०४ जणांचे कोरोना नमुने तपसणी अहवाल शुक्रवारी सांयकाळपर्यंत प्रलंबित होते़ दिवसभरात एकही अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे प्राप्त झाला नव्हता यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही थोडीशी धाकधुक वाढली आहे.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वेक्षणाद्वारे १ लाख ८ हजार ९२८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील २ हजार ४०८ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे़तर आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण ६६ रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान गुरूवारी रात्रीपर्यंत ३०४ जणांचे कोरोना तपसणी अहवाल स्वारातिम विद्यापीठातील प्रयोगशाळाकडे पाठविण्यात आले होते़परंतू शुक्रवारी सांयकाळपर्यंत ते पुर्ण प्रलंबित होते़ दिवसभरात एकही अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे प्राप्त झाला नव्हता़यामुळे थोडीशी धाकधुक वाढली आहे़तपसणी अहवाल उशीराने का येत आहे़ यावर सदर नमुना तपासणी किट रिप्लेसमेंन्ट करावी लागत आहे़ही प्रक्रिया सुरूच आहे़ यामुळे हे अहवाल प्रलंबित आहेत,असे म्हणता येणार नाहीत असे सांगण्यात आले.

Read More  रेड झोनमधील नागरिकांचा शिरकाव वाढल्याने ना ना करत आला कोरोना

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या २६ जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़सध्या ३३ पॉझिटिव्ह पैकी ८ रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे २४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

या ६६ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपैकी उपचाराअंती कोरोनामुक्त झालेल्या जवळपास २६ जणांना रूग्णालयातून सुटी देवून घरी पाठविण्यात आले आहे़ पुढील ७ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगरानीखाली राहणार आहेत़ परत काही लक्षणे आढळल्यास पुन्हा या रूग्णांना उपचारासाठी दाखल केले जाणार आहे़ मात्र कोणतीच लक्षणे न आढळल्यास या निगरानीतून त्यांची सूटका होणार आहे़

गर्दी नियंत्रणासाठी मनपाची १५ पथके
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद करण्यात आले आहेत़जर ती सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला तर लोकांची गर्दी होणार नाही, याचे नियोजन करण्यासाठी १५ सेंट्रल पथके स्थापन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ़सुनिल लहाने यांनी घेतला आहे़ या संदर्भात शुक्रवारी त्यांनी अधिकाºयांची बैठक घेवुन सुचना दिल्या़ दुकानदारास मास्क, सॅनिटायझर ठेवण्याची सक्ती करण्यात येणार आहे़ तर ग्राहकांना मास्क न वापरल्यास दंड आकारण्यात येणार आहे़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या