22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र३३ कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

३३ कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : डीआरआयने ऑपरेशन गोल्ड रश अंतर्गत सुमारे ३३ कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे पकडली आहेत. सुमारे ६५.४६ किलो सोन्याची खेप ईशान्य देशांतून मुंबई-पाटणा-दिल्ली येथे तस्करीमार्गे आणण्यात आली होती. करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिझोराममधून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करून एक मोठी खेप भारतात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन गोल्ड रश सुरू करण्यात आले होते. तस्करीसाठी देशांतर्गत कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपनीचा वापर करण्यात आला होता. तस्करी करून आणण्यात येणा-या सोन्याच्या खेप विविध प्रकारच्या घरगुती वस्तूंमध्ये लपवून आणण्यात आल्या होत्या. केलेल्या कारवाईत डीआरआयने महाराष्ट्रातील भिवंडी येथे ऑपरेशन गोल्ड रश अंतर्गत १२० सोन्याची बिस्किटे पकडली असून, ज्यांचे वजन सुमारे १९.९३ किलो तर किंमत अंदाजे १०.१८ कोटी रुपये आहे.

याशिवाय परदेशातून मिझोराममध्ये आलेले आणि तेथून मुंबईत पोहोचलेल्या याच मालाच्या २ खेप दिल्ली आणि पाटणा येथे कुरिअरद्वारे पाठवण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पाटणा येथील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. यामध्ये २८.५७ किलो वजनाची आणि सुमारे १४ कोटी रुपये किमतीची १७२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत.

३९४ सोन्याची बिस्किटे ताब्यात
तस्करी करून भारतात आणली जाणारी तिसरी खेप दिल्लीतून पकडण्यात आली असून, येथून १६.९६ किलो वजनाची १०२ सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहे. याची अंदाजे किंमत ८.६९ कोटी रुपये आहे. या सर्व कारवाईत डीआरआयने एकूण ३९४ सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या