24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये वीज कोसळून ३३ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

बिहारमध्ये वीज कोसळून ३३ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. बिहारमधील या अस्मानी संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेद व्यक्त करत मदतीचे आश्वासन दिले आहे.

तर, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि भूस्खलनामुळे आसामच्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. ताज्या घटनांनुसार नागाव, होजई, कचार आणि दररंग या चार जिल्ह्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. येथे पूर आणि भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १४ वर पोहोचली असून या भयानक पूर स्थितीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमधील सुमारे ७.१२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. तर, दुसरीकडे कर्नाटकातही या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूर आला आहे.

सूचनांचे पालन करा
दरम्यान, वीज पडून झालेल्या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत नागरिकांना सावध राहण्याचे ‘घरी रहा आणि सुरक्षित रहा’ असे म्हणत त्यांनी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सूचीबद्ध केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.

आसाममध्ये परिस्थिती गंभीर
गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये कोसळणा-या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागाव जिल्ह्यात ३.३६ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. कछार जिल्ह्यात १.६६ लाख, होजईमध्ये १.११ लाख आणि दारंग जिल्ह्यात ५२,७०९ लोक प्रभावित झाले आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या