28.3 C
Latur
Thursday, March 30, 2023
Homeमहाराष्ट्रशिवराज्याभिषेकासाठी ३५० कोटींची तरतूद

शिवराज्याभिषेकासाठी ३५० कोटींची तरतूद

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या सध्याची शिवसेना आणि भाजपा सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे.

अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५०वे वर्ष असून या महोत्सवासाठी ३५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी, शिवाय मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांसाठी २५० कोटींची तरतूद केली आहे.

याशिवाय, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय आणि शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या