28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयचार वर्षांत देशात ३६.२९ लाख सायबर हल्ले

चार वर्षांत देशात ३६.२९ लाख सायबर हल्ले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात या वर्षी जूनपर्यंत सायबर सुरक्षेशी संबंधित ६७०,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. २०१९ पासून गेल्या महिन्यापर्यंत देशात अशी तीस लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या चार वर्षात देशातील सायबर सुरक्षेत ३६.२९ लाखांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केला आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिलेल्या उत्तरात मिश्रा यांनी वरील माहिती दिली आहे.

मिश्रा म्हणाले की, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमच्या अहवालानुसार आणि ट्रॅक केलेल्या माहितीनुसार, २०१९ ते जून २०२२ पर्यंत देशात ३६.२९ लाख सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे. २०१९ मध्ये सुमारे चार लाख, २०२० मध्ये १२ लाख, २०२१ मध्ये १४ लाख आणि २०२२ मध्ये सुमारे ६.७४ लाख सायबर सुरक्षा घटनांचा मागोवा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारकडून उपाययोजना
देशातील वाढते सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाय योजना आखल्या जात असल्याचे मिश्रा यांनी यावेळी सभागृहात सांगितले. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना करत आहे.

मुख्य माहिती सुरक्षा अधिका-यावर जबाबदारी
सरकारने मुख्य माहिती सुरक्षा अधिका-यांना सायबर सुरक्षेतील महत्त्वाची भूमिका आणि जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. सर्व सरकारी वेबसाइट्स आणि अ‍ॅप्लिकेशन्स होस्ट करण्यापूर्वी सायबर सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी सरकारी वेबसाइट्स आणि अ‍ॅप्लिकेशन्सचे सायबर सिक्युरिटीशी संबंधित ऑडिटही नियमितपणे केले जाते. माहितीची सुरक्षा तपासण्यासाठी सरकारकडे ऑडिटिंग संस्था देखील असल्याचे मिश्रा यांनी यावेळी लोकसभेत स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या