20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात ३७ हजार बोगस नर्सेस?

राज्यात ३७ हजार बोगस नर्सेस?

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलने नोंदणीकृत केलेल्या नर्सेसमध्ये बोगस नर्सेसचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील चार वर्षांत कोणत्याही कागदपत्रांच्या तपासणीशिवाय, सुमारे ३७ हजार नर्सेसची नोंदणी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकारने आता या नर्सेसच्या पात्रतेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या नर्सेसनी कोरोना काळात आपले कर्तव्य बजावले आहे. आता गरज संपल्यानंतर नोकरीवरून कमी करण्यासाठीचा हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

कागदपत्रांशिवाय नोंदणी झालेल्या नर्सेस या राज्यासह देशभरात आणि परदेशात नोकरी करत आहेत. नर्सेसच्या या नोंदणीबाबत राज्य सरकारला एक गोपनीय अहवाल सादर करण्यात आला असून पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार, या नर्सेसच्या पदविका, उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका आदी कशाचीही पडताळणी करण्यात आली नव्हती. महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलने २०१६ मध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली होती. उमेदवाराचे नाव यादीत असून त्यांच्या नावासमोर कोणती कागदपत्रे सादर केली, पडताळणी केली याची माहिती नमूद करण्यात आली नाही.

कोणतीही कागदपत्रे न तपासता राज्यात जवळपास ३७ हजार नर्सेसची नोंदणी केल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलच्या प्रभारी कुलसचिव रिचेल जॉर्ज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्तात म्हटले आहे. कोरोना काळात कॉन्सिलच्या कार्यालयात या नर्सेसना येणे शक्य नव्हते. त्यामुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार, त्यांची नोंदणी केली असल्याचे जॉर्ज यांनी सांगितले. नोंदणी केली नसती तर संबंधित परिचारिकांचे एक वर्ष वाया गेले असते, असेही त्यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या