34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeसोलापूर शहरातील ३९ पुरुष अन् १७ महिला पॉझिटिव्ह

सोलापूर शहरातील ३९ पुरुष अन् १७ महिला पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना संशयितांची टेंिस्टग वाढविल्यानंतर आज शहरात 56 रुग्ण आढळले असून 890 जणांची टेस्ट करण्यात आली. संशयितांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. शहरातील कोरोनाला आवर घालण्यासाठी संशयितांचे टेंिस्टग वाढविण्यात येणार आहे. कोरोना वाढू नये म्हणून सोशल डिस्टंिन्सगचे पालन करावे, मास्क वापरावे आणि हाताची स्वच्छता राखावी असे आवाहन केले जात आहे.

शहरात आज दमाणी नगर, सम्राट अशोक सोसायटी (विजयपूर रोड), जुनी मिल कंपाउंड (मुरारजी पेठ), मंगळवार पेठ, गुरुनाथ नगर (कुमठा नाका), भवानी पेठ, माशाळ वस्ती, न्यू पाच्छा पेठ, निर्मिती विहार, शांभवी रेसिडेन्सी (जुळे सोलापूर), मंगळवार पेठ (शिवगंगा मंदिराजवळ), आरटीओ कार्यालयाजवळ (विजयपूर रोड), मंत्री चंडक आंगण, गांधी नगर (रविवार पेठ), वीरशैव नगर, झुंजे कॉम्प्लेक्­स (दक्षिण कसबा), समर्थ सोसायटी, कृष्णा पार्क (विजयपूर रोड), जोडभावी पेठ, रामराज्य नगर (शेळगी), बलिदान चौक (भवानी पेठ), दक्षिण कसबा, नरेंद्र नगर (सैफूल), लतादेवी नगर (कुमठा नाका), अंलकापुरी नगर (दमाणी नगर), आसरा सोसायटी, होटगी नाका (सिव्हिल लाईन), दक्षिण कसबा (जुना विठ्ठल मंदिराजवळ), ककय्या नगर (शेळगी), मनपा कॉलनी (दक्षिण सदर बझार), दमाणी नगर, सिध्देश्­वर पेठ, समर्थ चौक (बुधवार पेठ), जुनी मिल कंपाउंड, कृष्णा रेसिडेन्सी (दत्त चौक), आर्यनंदी नगर (वसंत विहार), पाटील नगर, चैतन्य नगर (विजयपूर रोड), वालचंद कॉलेजमागे आणि बसवेश्­वर नगर (अंत्रोळीकर नगर) येथे नवे रुग्ण सापडले आहेत.

नायिका बनताहेत दिग्दर्शिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या