कर्नाटक : कर्नाटक आणि झारखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी कर्नाटकमधील हंपी येथे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याच वेळी झारखंडच्या जमशेदपूर येथे ०६.५५ वाजता भूकंप झाल्यामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. हंपी येथे भूकंपांची तीव्रता ४.० रिश्टर स्केल एवढी होती. तर जमशेदपूरमध्ये भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपानंतर लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. परंतु, शहरात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
Read More औरंगाबादेत आज 59 रुग्णांची वाढ
गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीसह अनेक राज्यात भूकंप झाला आहे. ३ जूनच्या रात्री नोएडा येथे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.२ होती. दिल्ली-एनसीआर प्रदेशात गेल्या दीड महिन्यांत सुमारे दहा वेळा भूकंप झाला. तथापि, वैज्ञानिक डॉक्टर बीआर बन्सल म्हणतात की दिल्लीत कोणताही धोका नाही आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. दिल्ली-एनसीआर क्षेत्रात आतापर्यंत झालेले भूकंप कमी तीव्रतेचे होते. बुधवारी ३ जून रोजी सकाळी ७ वाजून १० मिनीटांनी भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे तीव्र बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.३ एवढी होती.