24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयहिमाचलमध्ये जेसीबी दरीत कोसळून ४ ठार

हिमाचलमध्ये जेसीबी दरीत कोसळून ४ ठार

एकमत ऑनलाईन

कुल्लू : हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील बंजार उपमंडल येथे एक मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी जेसीबी रस्त्यावरून दरीत कोसळला. या घटनेत जेसीबीत ४ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जेसीबीमध्ये एकूण सात जण होते.

जखमींना कुल्लू येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रस्त्याच्या कामासाठी जात असलेल्या जेसीबीमध्ये एकूण सात जण होते. जेसीबी चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी रस्त्यावरून थेट दरीत जाऊन कोसळला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या