18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात कारने ४ मजुरांना चिरडले

मध्य प्रदेशात कारने ४ मजुरांना चिरडले

एकमत ऑनलाईन

 ८ जण जखमी, रतलाम जिल्ह्यातील दुर्घटना
भोपाळ : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. रतलाममधील जमुनिया गावाजवळ ही घटना घडली. या रस्ते अपघातात एक कार डझनभराहून अधिक मजुरांच्या अंगावरून गेल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. रतलामचे एसपी अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जमुनिया गावाजवळ एका महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत ४ कामगार ठार तर ८ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात कारमधील पाच जणांसह एकूण १३ जण जखमी झाले आहेत. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्गावरील रेलिंग दुरुस्तीचे काम करणा-या मजुरांच्या अंगावर गेली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

यात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच जणांसह १३ जण जखमी झाले. जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. हे मजूर उत्तर प्रदेशातील अलिगढचे रहिवासी होते. एका कंत्राटदाराने त्यांना कामावर ठेवले होते. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या