24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयनितीन गडकरींना युट्यूबकडून महिन्याला ४ लाखांची रॉयल्टी

नितीन गडकरींना युट्यूबकडून महिन्याला ४ लाखांची रॉयल्टी

एकमत ऑनलाईन

भडोच : आपल्याला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपयांची रॉयल्टी मिळते असे केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. नितीन गडकरी यांची बरीच भाषणे यु-टयूटबवर अपलोड केली जातात. जगभरातून ही भाषणे पाहिली जातात. त्यामुळे ही रॉयल्टी मिळते असे गडकरी यांनी सांगितले.

मुंबई- दिल्ली एक्­स्प्रेस वेची पाहणी केल्यानंतर प्रकाराशी बोलताना गडकरी म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरी स्वयंपाक करण्याबरोबरच व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बरीच भाषणे केली. यामध्ये ९५० भाषणांचा समावेश आहे. ही भाषणे युटयूबवर अपलोड केल्यानंतर जगभरातून ही भाषणे पाहिले जातात. त्यामुळे आपल्याला युटयूबकडून महिन्याला चार लाख रुपये रॉयल्टी मिळत असल्याची माहिती गडकरींनी स्वत: दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या