27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउमरीत ४ रूग्ण आढळले, रूग्ण संख्या १३७

उमरीत ४ रूग्ण आढळले, रूग्ण संख्या १३७

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
बालतपस्वी महाराजासह अन्य एकाच्या हत्येमुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या उमरी शहरात मंगळवारी चार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत़यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे़ तर नांदेड जिल्हयाची रूग्ण संख्या आता १३७ वर गेली आहे़दरम्यान उपचाराअंती बरे झालेल्या १६ रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

आत्तापर्यंत नांदेड शहरातच कोरोनाचे जास्त रूग्ण सापडले आहेत़मात्र त्यानंतर जिल्ह्याच्या एक एक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मंगळवार दि़ २६ रोजी आलेल्या अहवालात उमरी तालुक्यातील नवीन चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसापूर्वी उमरी तालुक्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती आता यात चार रुग्ण सापडल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील प्रयोग शाळेकडून मंगळवार दि. २६ मे रोजी १२२ नमूने तपासणीचा अहवालांपैकी १११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ४ अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्वच्या सर्व अहवाल हे उमरी तालुक्यातील आहे. त्यामुळे रुग्णसंख्या १३३ वरून आता १३७ झाली आहे. तर ७ जणांचा मृत्यु झाला आहे.

Read More  कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

दररोज कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे़तशी तशी नांदेडकरांची चिंताही वाढत आहे़आत्तापर्यंत १ लाख ३५ हजार १७३ सर्वेक्षण झाले़ स्वॅब ३४६० घेण्यात आले़ यात निगेटिव्ह स्वॅब २९४१ आले़ एकुण पॉझिटिव्ह रुग्ण १३७ झाले़तर स्वॅब तपासणी अनिर्णीत १३५, १४ जणांचे स्वॅब नाकारण्यात आले़ ७९ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. ५१ रुग्णांपैकी ७ रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे २९ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ५, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे १ रुग्ण,ग्रामीण रूग्णालय माहूर १,उपजिल्हा रूग्णालय गोकुंदा १,उमरी ग्रामीण रूग्णालयात ४ तर रूग्णांना मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़ या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे. मात्र यातील दोन रूग्णांची प्रकृती गंभीर आहे.

रुग्णांत लहान मुलांचा समावेश
नव्याने सापडलेल्या चार रुग्णांमध्ये ७ वर्षाच्या मुलगा, ९ व १४ वर्षांची मुलगी व ४८ वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. या सर्वांवार उमरी येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे़ सदरील व्यक्ती हे बाहेरील शहरातून मुळगावी उमरी येथे परतले होते़ ते येताच या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते़

मंगळवारी १६ जणांना डिस्चार्ज
आरोग्य यंत्रणेकडून मंगळवार दि. २७ मे रोजी एनआरआय यात्री निवास येथील उपचार घेणा‍ºया १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७९ झाली आहे. तर ५१ जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच ५२ व ५५ वय वर्षे असलेल्या दोन महिलांची प्रकृती नाजूक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या